उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात
बारामती - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये मोठा अपघात झाला आहे.
आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अजित पवार विमानाने बारामतीमध्ये आले होते.
बारामतीत विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळले आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.