प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्यावतीने नागदेववाडीतील आदर्श विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किट्स वाटप
कोल्हापूर – प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था, आदर्श विद्यामंदिर, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागदेववाडी येथील आदर्श विद्या मंदिरातील ५१ गरजू विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किट्स प्रदान करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत संस्थांनी ही सामाजिक बांधिलकी जपली आहे.
महेश कुलकर्णी, अमरसिंग राजपूत, पुष्कर बोरगावकर, माधव बोरगावकर, अजय खतकर, श्रावणी खतकर, प्रणाली खतकर, नाना बोरगावकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना किट्स देण्यात आले.
या उपक्रमासाठी अंजली पाठक, शितल महाजनी, प्रसाद बुरांडे, विश्राम कुलकर्णी, ओंकार पोतदार , महेश कुलकर्णी, संजय हेगिष्टे, उदय हिडदुग्गी, उदय शेळके यांचे सहकार्य लाभले.