प्रा. प्राची जगताप-इंगळे यांना पीएचडी प्रदान... 

<p>प्रा. प्राची जगताप-इंगळे यांना पीएचडी प्रदान... </p>

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील वडणगे -निगवे दुमाला येथील प्राची अशोक जगताप-इंगळे यांना पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विदयापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. त्या सध्या वडणगे - निगवे दुमाला येथील प्रताप ज्युनिअर कॉलेजमध्ये अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
कोल्हापूर जिल्हयातील माध्यमिक स्तरातील विदयार्थ्यांमध्ये  जागतिक तापमानवाढीबाबत जाणीव जागृती कार्यक्रमाची निर्मिती आणि त्याची परिणामकारता अभ्यासणे यावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना बार्शीमधील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे  प्रा.डॉ सुग्रीव श्रीमंत गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.