इचलकरंजीत मेफेंटरमाईन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनच्या विक्री प्रकरणी युवकाला अटक

<p>इचलकरंजीत मेफेंटरमाईन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनच्या विक्री प्रकरणी युवकाला अटक</p>

इचलकरंजी - शहरातील पंचगंगा नदी जवळील स्मशानभुमी जवळ एक तरुण मेफेटरमाईन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून समर्थ दत्तात्रय चौगुले या तरुणाला संशयावरून ताब्यात घेतले आहे. तपासणीत पोलिसांना त्याच्याकडे मेफेटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या १०० बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी ही इंजेक्शन, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस उपनिरीक्षक गोविंद कोळेकर या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.