सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या काँग्रेसला निवडून द्या : आ.सतेज पाटील याचे आवाहन
कोल्हापूर – सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने लढत राहिला आहे आणि या पुढेही हीच भूमिका कायम राहील. त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेच्या पाठीशी भक्कमपणे राहीले पाहीजे, असे प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी केले. कळंबे तर्फ ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि दोन्ही पंचायत समितीमधील काँग्रेस उमेदवारांसाठी दऱ्याचे वडगाव आणि दिंडनेर्ली येथे प्रचारसभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी संभाजी बोटे, शांतीनाथ बोटे, दिगंबर पाटील, वसंत मगदूम, राजू चौगले, संजय परीट, सर्जेराव काळुगडे, नामदेव पाटील, एम.जी. पाटील, अरविंद शिंदे यांच्यासह उमेदवार मनिषा पाटील, अनिल पांडुरंग म्हेत्रे, सुजाता नरके यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.