कळंबा परिसरातील काँग्रेसची ताकद मतपेटीतून दाखवा : आ. सतेज पाटील 

<p>कळंबा परिसरातील काँग्रेसची ताकद मतपेटीतून दाखवा : आ. सतेज पाटील </p>

कोल्हापूर - काँग्रेसच्या विचारांवर आणि धोरणांवर जनतेचा विश्वास आहे. हा विश्वास मतपेटीत उतरवण्यासाठी कार्यकर्त्यांनी येत्या काही दिवसात एकजुटीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नशील राहीले पाहिजे, असे प्रतिपादन आ. सतेज पाटील  यांनी केले आहे. कळंबे तर्फ ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार मनीषा पाटील- टोपकर, पंचायत समितीचे उमेदवार अनिल म्हेत्रे आणि सुजाता नरके यांच्या प्रचारार्थ कळंबा येथे प्रचारसभा काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कळंबा परिसरातील काँग्रेसची ताकद मतपेटीतून दाखवूया, असेही त्यांनी म्हटले आहे. 

यावेळी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, सरपंच सुमन विश्वास गुरव, उपसरपंच रोहित मिरजे, उदय जाधव, दिलीप उघडे, माजी सरपंच शिवाजी कांबळे, विश्वास पोवार- बावडेकर, संदीप पाटील, माजी सरपंच विश्वास गुरव, वैशाली टिपुगडे, मुक्ताबाई टिपुगडे, स्नेहल जाधव, पुनम जाधव, कृष्णात कोथळीकर, रंगराव तिवले, केरबा पाटील, भगवान पाटील, सुरेश दिवसे, शिवाजी गुरव, उदय सुतार, उमेश नरंदे, संग्राम चौगले यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.