कोल्हापूर महानगरपालिकेच्या गटनेते पदावर शिक्कामोर्तब...
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिका सभागृहातील गटनेता ठरल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुभव चेहऱ्यांना पसंती देण्यात आली आहे .
भाजपकडून गेल्या 20 ते 30 वर्षांपासून महानगरपालिकेच्या सभागृहात असणारे नगरसेवक मुरलीधर जाधव यांची गटनेता पदावर निवड करण्यात आली आहे . शिवसेनेकडून माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांची निवड गटनेते पदावर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून दोन वेळा सभागृहात निवडून आलेले माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांची गटनेते पदावर निवड झाली आहे.