उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चाललेत 

खा.संजय राऊतांचा खळबळजनक दावा

<p>उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चाललेत </p>

मुंबई – उद्योगमंत्री उदय सामंत यांनी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे लवकरच आमच्या सोबत दिसतील, असे वक्तव्य केले होते. यावर खा. संजय राऊत यांनी,  स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.


संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत. या दाव्यांना अर्थ नाही. स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का? असा दावा त्यांनी केला.