दिव्यांगतेवर मात करणारी माऊली अडकुर हिने पायांनी फडकवला राष्ट्रध्वज...
पायांनीच सादर केलं ‘सारे जहाँ से अच्छा’
कोल्हापूर – माऊली अडकुर हीने आपल्या जिद्दीच्या जोरावर जन्मता दोन्ही हात नसताना, आपल्या पायालाच हात बनवत शिक्षण, संगीत आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. सध्या ती सोलापूरमध्ये सरकारी नोकरी करत आहे. Helpers of the Handicapped संस्थेच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला तिने नुकतीच उपस्थिती लावली. यावेळी तिने आपल्या पायांनी राष्ट्रध्वज फडकवला. तसेच पायांनी पेटी वाजवत ‘सारे जहाँ से अच्छा’ हे देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या सर्व कार्यात तिला Helpers of the Handicapped, कोल्हापूर या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभेल. माऊलीची ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नसून, ती असंख्य दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा देणारी ठरली आहे. यावेळी उपस्थित सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात माऊलीच्या कर्तृत्वाला सलामी दिली.