‘एक केस झाली म्हणून गप्प बसणार नाही...’: पोलीस कोठडीची हवा घेवून देखील मंत्री पुत्राचं बेताल वक्तव्य सुरूच
महाड - महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदान केंद्रावर राडा केल्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर विकास गोगावले दोन महिन्याहून अधिक काळ फरार झाले होते. कोर्टाने फटकारल्यानंतर विकास गोगावलेंसह १३ जण पोलिसाना शरण गेले होते. त्यांची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
दोन दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर तुरुंगातून विकास गोगावलेची सुटका झालीय. यानंतर विकास गोगावले याने राजकीय कार्यक्रमांला उपस्थिती लावत बेताल वक्तव्य केले आहे.
‘एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाहीय, न्याय देवतेनं आदेश दिला म्हणून मी शरण गेलो’ असं म्हणत विकास गोगावले याने विरोधकांना डिवचलं आहे.