राजारामपुरीत शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग... सुमारे ३५ लाखांचे नुकसान
कोल्हापूर - राजारामपुरी तिसरी गल्ली येथील करण जाधव यांच्या घराला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अचानक आग लागली. यामध्ये त्यांचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही सर्व घटना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.
राजारामपुरी येथील ताराराणी शाळेच्या पिछाडीला करण जाधव हे कुटुंबीयांसमवेत राहतात. जाधव यांच्या घरी उदबत्ती तयार करण्याचा कारखाना आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाधव यांच्या घरी शॉर्टसर्किटने आग लागली. दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले आहे.