आ. सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत जपला ‘असा’ जिव्हाळा 

<p>आ. सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत जपला ‘असा’ जिव्हाळा </p>

कोल्हापूर – जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान आ. सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत आपला जिव्हाळा जपला आहे. प्रचारासाठी दिवसभरात व्यस्त असणारे आ. सतेज पाटील यांनी दऱ्याचे वडगाव येथील नागनाथ मंदिर परिसरात कार्यकर्त्यांबरोबर चक्क पंगतीत जेवण केले. 

सत्तेपेक्षा जनतेची साथ महत्त्वाची मानणाऱ्या आमदार सतेज पाटील यांच्या या कृतीतून कार्यकर्त्यांशी असलेलं घट्ट नातं आणि मातीशी असणारी नाळ अधोरेखित झाली. त्यांच्या या  कृतीमुळे कार्यकर्ते भारावले. त्यांच्यात उत्साहाचं आणि सकारात्मक ऊर्जेचं वातावरण पाहायला मिळालं. दिवसभराच्या थकव्यावर उतारा ठरलेला हा क्षण प्रचाराच्या धावपळीत एक दिलासा देणारा ठरला.