शाहू स्मारक भवनात २६ ते २९ जानेवारीपर्यंत देवबाग आर्ट कॅम्प निसर्गचित्र प्रदर्शन...

<p>शाहू स्मारक भवनात २६ ते २९ जानेवारीपर्यंत देवबाग आर्ट कॅम्प निसर्गचित्र प्रदर्शन...</p>

कोल्हापूर - जिल्हा कलाध्यापक संघाच्यावतीने देवबाग मध्ये आर्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये जिल्ह्यातील तीसहून अधिक कला शिक्षकांनी सहभाग घेत साठ ते सत्तर निसर्गचित्रे रेखाटलीय आहेत. या निसर्गचित्रांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना सुवर्णा सावंत यांनी, या चित्रप्रदर्शनामुळे कलाशिक्षकांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याचे सांगितले. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी, या प्रदर्शनामुळे कला शिक्षकांना प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले. कलारसिकांसाठी आजपासून २९ जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्त प्रदर्शनात कलाकृती सादर केलेल्या कलाशिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

 यावेळी दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, कलानिकेतन महाविद्यालयाचे मनोज दरेकर, एकनाथ कुंभार, अनिल अहिरे, शिवकुमार मुरतले, धनाजी सुतार, विठ्ठल पाटील यांच्यासह कलाशिक्षक उपस्थित होते.