मौनी विद्यापीठात आ. सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

<p>मौनी विद्यापीठात आ. सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन</p>

कोल्हापूर - ज्ञानासोबतच संस्कारांची बीजे रुजवणारे मौनी विद्यापीठ आज राधानगरी व भुदरगड तालुक्यांसाठी मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीचे केंद्र बनले आहे. अशा संस्थेचा एक घटक असणे माझ्यासाठी गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी केले आहे. आज प्रजासत्ताक दिनी मौनी विद्यापीठाच्या प्रांगणात मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, के.डी.सी.सी बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, राहुल बजरंग देसाई, संचालक डॉ. पी. बी. पाटील, बाजीराव चव्हाण, डॉ. अरविंद चौगले, डॉ. आर. डी. बेलेकर, शामराव देसाई, सुरेश नाईक, शिवाजी चोरगे, विजय कदम, प्रा. उदय शिंदे, सरपंच प्रकाश वासकर सर्व विभागप्रमुख, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी- विद्यार्थिनी  उपस्थित होते.