आज दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचा गणपती बाप्पा मोरयाचा गजर घुमला...

<p>आज दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचा गणपती बाप्पा मोरयाचा गजर घुमला...</p>

नवी दिल्ली – आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत राजपथावर भव्य पथसंचलन पार पडले. राजपथावर भारतीय सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाच्या विविध रेजिमेंट्सचा सहभाग होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परेडचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 
यावेळी विविध राज्यांचे चित्ररथांचे संचलन पार पडले. यामध्ये महाराष्ट्राचा गणपती बाप्पा मोरयाचा गजर घुमला. राजपथावर  गणेशोत्सव ही मुख्य थीम असलेला महाराष्ट्राचा चित्ररथ गौरवाने मिरवला गेला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल यांनी टाळ्या वाजवून महाराष्ट्राच्या रथाचे कौतुक केले.