टाकाळा आग : शॉर्टसर्किटमुळे उदबत्ती कारखान्याला आग, सुमारे 35 लाखांचे नुकसान

<p>टाकाळा आग : शॉर्टसर्किटमुळे उदबत्ती कारखान्याला आग, सुमारे 35 लाखांचे नुकसान</p>

कोल्हापूर - रविवारी सायंकाळच्या सुमारास राजारामपुरी तिसरी गल्ली, ताराराणी शाळेच्या पाठीमागील भागात राहणाऱ्या करण जाधव यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जाधव यांच्या घरात उदबत्ती तयार करण्याचा कारखाना असून आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून गेल्या अडीच तासांपासून आग विझवण्याचे काम सुरू आहे. राजारामपुरी तिसरी गल्ली येथील ताराराणी शाळेच्या पाठीमागे करण जाधव हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरात उदबत्ती तयार करण्याचा कारखाना आहे. आज सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे त्यांच्या घराला आग लागली. या आगीत सुमारे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गेल्या दोन ते अडीच तासांपासून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे.