सोने  - चांदीच्या आजच्या दराने  मोडले सगळे विक्रम 

<p>सोने  - चांदीच्या आजच्या दराने  मोडले सगळे विक्रम </p>

जळगाव – राज्यातील जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.  त्यामुळे सर्वसामान्यांना  सोने – चांदी खरेदी करणे न परवडणारे झाले आहे.  .
आज सोन्याच्या दरात 3 हजार 200 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे.  सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 62 हजार 800 रुपये तर  चांदीचे दर जीएसटीसह 3 लाख 50 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या दराने आज उच्चांकी दर गाठला आहे.  सलग चार-पाच दिवसापासून सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने तेजी आहे. आजच्या दराने  सगळे विक्रम मोडले आहेत.