नृसिंहवाडीत जि.प आणि पंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ...
...हा कसला भाजपचा हिंदुत्ववाद ? आ. सतेज पाटील यांचा सवाल
कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, मुख्यमंत्री राज्यात कोट्यवधींची गुंतवणूक झाल्याचे सांगतात मात्र गुंतवणुक किती झाली याचे आकडे नको तर रोजगार किती देणार याचे आकडे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
भाजप आणि शिंदेसेनेला जनतेचे दुःख सावरण्यासाठी नाही तर स्वतःचे खिसे भरण्यासाठी सत्ता हवीय, अशी टीका त्यांनी केली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी, महायुतीने नगरपालिका निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर केला, असा आरोप केला. ग्रामीण भागातील सच्चा कार्यकर्त्यांला न्याय देण्यासाठी आम्ही आघाडी केल्याचे त्यांनी सांगितले.
दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी, शेतकरी संघटना, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र राहून शिरोळ तालुक्याचा विकास करतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे, विश्वजित कांबळे, स्वाती सासणे आदींनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी आम आदमी, शरदचंद्र पवार गटानेही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष दरगू गावडे, उबाठा गटाचे वैभव उगळे, मधुकर पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक शेखर पाटील, उदय पाटील, अनंत धनवडे, सचिन शिंदे, विठ्ठल मोरे, विशाल चौगुले, संजय अनुसे, विक्रम पाटील, अवधूत धनवडे यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवार, आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.