सुई टोचण्या आधीच दिसणार नसा ; चीनचा वैद्यकीय क्षेत्रात नवा शोध
नवी दिल्ली - चीनने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची तांत्रिक झेप घेतली आहे. चिनी शास्त्रज्ञांनी त्वचेखालील नसा स्पष्टपणे दाखवणारे अत्याधुनिक उपकरण विकसित केले आहे. इन्फ्रारेड किरणांच्या सहाय्याने हे उपकरण रिअल-टाईममध्ये नसांचा रंगीत डिजिटल नकाशा त्वचेवर दर्शवते. या तंत्रज्ञानामुळे इंजेक्शन व सलाईन लावणे अधिक सोपे, अचूक आणि वेदनारहित होणार आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि गंभीर रुग्णांसाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार असून, चुकीच्या ठिकाणी सुई लागण्यामुळे होणाऱ्या गुंतागुंती टळणार आहेत. लवकरच हे तंत्रज्ञान जगभरातील प्रमुख रुग्णालयांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.