कोल्हापूर महापालिकेचा महापौर, उपमहापौर 'या' दिवशी ठरणार
कोल्हापूर – राज्यातील महापौर पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत झाली. यात कोल्हापूरचे महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित झाले त्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी रोजी विशेष सभा घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार असून कोल्हापूरच्या महापौर पदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.