गोळीबार केल्या प्रकरणी ‘या’ अभिनेत्याला अटक 

<p>गोळीबार केल्या प्रकरणी ‘या’ अभिनेत्याला अटक </p>

मुंबई - मुंबईतील अंधेरीतील ओशिवरा परिसरात गोळीबार केल्या प्रकरणी अभिनेता कमाल आर खान याला अटक करण्यात आली आहे. 
अभिनेता कमाल आर खान याने  ओशिवरा येथील एका निवासी इमारतीवरून गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कमाल आर खान याची चौकशी केली. या चौकशीत त्याने गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.