छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले, पण…: खा.संजय राऊतांचा हल्लाबोल 

<p>छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले, पण…: खा.संजय राऊतांचा हल्लाबोल </p>

मुंबई – काल मुंबईच्या विशेष न्यायालयाने मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. यावर खा. संजय राऊत यांनी, “छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले, पण भुजबळांच्या सर्व प्रकरणात ईडीपासून ओडब्ल्यूपर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे”, असा हल्लाबोल केला आहे. 
खा. संजय राऊत म्हणाले कि, सर्वात भ्रष्ट पक्ष जर देशात कोणताही असेल, तर तो भारतीय जनता पक्ष आहे. जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे, तोपर्यंत सगळे मनानं, तनानं, धनानं भाजप बरोबरच राहणार. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल, त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग ते आमच्याबरोबर असतील.

तुम्ही त्यांना एकदा क्लीन चीट दिली आहे ना. स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले, आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात? त्या फाईलमध्ये काय आहे की नुसत्या डरकाळ्या फोडताय पोकळ?