काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर...
खा.शाहु महाराज, आ. सतेज पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश
मुंबई - आगामी 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणूकांसाठी काँग्रेसकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये आ. रमेश चेन्निथला, माजी मंत्री हर्षवर्धन सपकाळ, आ. विजय वडेट्टीवार, खा. शाहु महाराज, आ. सतेज पाटील, मुकुलजी वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, रजनीताई पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसिम खान, श्रीमती यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमिन पटेल, डॉ. नितीन राऊत, अमित देशमुख, आ. विश्वजीत कदम, अनिस अहेमद, रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजीद खान पठाण, प्रा. वसंत पुरके, धिरज देशमुख, रामहरी रूपनवर, एम. एम. शेख, वजाहत मिर्झा, अतुल लोंढे, सिध्दार्थ हत्तिअंबीरे, यशपाल भिंगे, मुफ्ती हारून नदवी, शाह आलम शेख, श्रीमती संध्या सव्वालाखे, शिवराज मोरे, विलास औताडे, सागर साळुंके, अक्षय राऊत, हनुमंत पवार आदींच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.