पुन्हा एकदा बदलापूर हादरलं : चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

<p>पुन्हा एकदा बदलापूर हादरलं : चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार</p>

मुंबई – बदलापूरमध्ये स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली  आहे.  . त्यामुळे पुन्हा एकदा बदलापूर हादरले आहे. काही महिन्यांपूर्वी बदलापूर शाळेतील मुलीवर झालेच्या  अत्याचाराची घटना  अद्याप ताजी  असताना आणखी एक असा प्रकार घडल्यानं  धक्का बसला आहे. 
ज्या स्कूल व्हॅनमध्ये ही घटना घडली ती ती स्कूल व्हॅन अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. एका खाजगी व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात होती. या व्हॅनला आरटीओकडून परवानगी देण्यात आली नव्हती. या स्कूल व्हॅनवर वाहतूक शाखेने कारवाई केली असून व्हॅनचा परवाना रद्द करण्यात आला आहे.