‘या’ दिवशी बँक कर्मचारी देशव्यापी बँक बंद आंदोलन करणार…
कोल्हापूर - पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, नवीन कामगार कायद्यांच्या विरोध येत्या २७ जानेवारीला एकदिवशीय देशव्यापी बँक बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बैंक एम्प्लॉइज फेडरेशनच्यावतीने पत्रकार बैठकीत देण्यात आली.
सध्याचे केंद्र सरकार हे सातत्याने सार्वजनिक बँकांच्या विरोधातील धोरणे राबवत आहेत. हे सरकार उद्योगधार्जिण असल्याने मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीचे निर्णय घेतले जात आहेत, यासह मागील दहा वर्षांपासून बँकांचा आठवडा हा पाच दिवसाचा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सरकारने करार केला होता. आरबीआय कडून मंजुरी सुद्धा मिळालीय, मात्र अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. याला पी एम ऑफिसकडून अडवणूक होत आहे. त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या पत्रकार बैठकीला संघटनेचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर, बी जयराम, महेंद्र प्रभुलकर, अक्षय स्वामी, एन शंकर, महिंद्र ताटे, मकरंद करंदीकर,गणेश कुडाळकर आदी उपस्थित होते.