मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी ‘या’ महिलांच्या नावांची जोरदार चर्चा...

<p>मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी ‘या’ महिलांच्या नावांची जोरदार चर्चा...</p>

मुंबई - आज राज्यातील महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानुसार मुंबई महापालिकेत महिला महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालं  आहे. या पदासाठी  अनेकांची नावं  चर्चेत येत आहेत . यामध्ये रितू तावडे, माजी उपमहापौर अलका केरकर, तेजस्वी घोसाळकर, राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कोण मुंबई महापालिकेच्या महापौर पदी कोण विराजमान होणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे.