भावानेच जमिनीच्या मोबदल्यासाठी भावाची केली ३२ लाखांची फसवणूक

<p>भावानेच जमिनीच्या मोबदल्यासाठी भावाची केली ३२ लाखांची फसवणूक</p>

कोल्हापूर – सख्ख्या  भावाने जमिनीचा मोबदला हडप करण्यासाठी आपल्या भावाची ३२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना करवीर तालुक्यातील शिये येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. 
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला हडप केल्या प्रकरणी  विचारणा केली असता सख्या भावानेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.  या धमकी  प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
आरोपी शशिकांत रघुनाथ पाटील ( वय ६९)  व फिर्यादी सुभाष रघुनाथ पाटील ( वय ५६) हे सख्खे  भाऊ आहेत. त्यांची शिये येथे जमीन आहे. ही जमिन नव्या सुरू असणाऱ्या महामार्गासाठी संपादीत केली आहे. या  संपादीत क्षेत्राच्या मोबदल्यात त्यांना  ३२ लाख रूपये मंजुर झाले होते. यामध्ये दोघा भावांची वाटणी असताना मात्र आरोपी शशिकांत पाटील याने मोठ्या विश्वासाने करारावर सह्या घेतल्या आणि  सर्व रक्कम स्वतःकडे ठेवून घेतली. जेव्हा सुभाष पाटील यांनी त्यांच्या हिश्याची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास  नकार दिला. आणि सुभाष पाटील यास शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी सुभाष पाटील यांनी कोल्हापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार  आता शिरोली एमआयडीसी पोलिसांनी शशिकांत रघुनाथ पाटील  याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.