'केडीएमसीसारखं मुंबईत घडू शकतं’ : मनसेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य 

<p>'केडीएमसीसारखं मुंबईत घडू शकतं’ : मनसेच्या बड्या नेत्याचं सूचक वक्तव्य </p>

मुंबई – कल्याण – डोबिंवली महापालिकेत शिंदेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येवून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. असाच प्रकार मुंबई महापालिकेत होवू शकतो, असे सुतोवाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. त्यामुळे  उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे. 
मुंबईत काहीही घडू शकतं, असे सूचक वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी करत  'केडीएमसीसारखं मुंबईत घडू शकतं' असेही म्हटले आहे. केडीएमसीमध्ये मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा  देत सकारात्मक भूमिका घेतली आहे त्यानुसार  मुंबई महापालिकेत मराठी माणूस महापौर होत असेल तर राज ठाकरे सकारात्मक विचार करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.