कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेमध्ये ओबीसी महापौर..! 

 

<p>कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेमध्ये ओबीसी महापौर..! </p>

<p> </p>

मुंबई - राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौर पदाचे आरक्षण  नुकताच जाहीर झाले आहे. यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेमध्ये ओबीसी महापौर विराजमान होणार हे आता निश्चित झाले आहे.

1. बृहन्मुंबई (BMC) - सर्वसाधारण

2. ठाणे - अनुसूचित जाती (एससी)

3. कल्याण-डोंबिवली - अनुसूचित जमाती- एसटी 

4. नवी मुंबई - सर्वसाधारण महिला

5. वसई-विरार - सर्वसाधारण

6. भिवंडी-निजामपूर - सर्वसाधारण प्रवर्ग महिला

7. मीरा-भाईंदर - सर्वसाधारण

8. उल्हासनगर - ओबीसी

9. पुणे - सर्वसाधारण महिला 

10. पिंपरी-चिंचवड – सर्वसाधारण  महिला

11. नागपूर - सर्वसाधारण

12. अहिल्यानगर - ओबीसी- महिला

13. नाशिक - सर्वसाधारण

14. छत्रपती संभाजीनगर - सर्वसाधारण

15. अकोला - ओबीसी-महिला

16. अमरावती - सर्वसाधारण

17. लातूर - अनुसूचित जाती (एससी)- महिला

18. नांदेड-वाघाळा – सर्वसाधारण महिला 

19. चंद्रपूर - ओबीसी- महिला

20. धुळे - सर्वसाधारण प्रवर्ग महिला

21. जळगाव – ओबीसी महिला

22. मालेगाव – सर्वसाधारण महिला

23. कोल्हापूर - ओबीसी

24. सांगली-मिरज-कुपवाड - सर्वसाधारण

25. सोलापूर - सर्वसाधारण

26. इचलकरंजी - ओबीसी

27. जालना - अनुसूचित जाती (एससी)- महिला

28. पनवेल - ओबीसी- महिला किंवा पुरूष

29. परभणी - सर्वसाधारण