या वर्षी सतेज कृषी प्रदर्शनाला सुरुवात होणार ‘या’ दिवसापासून...
कोल्हापूर - काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून गेली 7 वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, या अनुषंगाने सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन कळंबा येथील तपोवन मैदानात पाच डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीत भरवण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाच्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका प्रतिक्षा पाटील, वनिता देठे, दुर्वास कदम, राजेश साबळे, दिग्विजय मगदूम, धीरज पाटील, रमेश चावरे, शिवराज पाटील, दत्ता बामणे, प्रवीण पाटील,कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव, उपसरपंच दिपाली रोपळकर,विकास बावडेकर जाधव, रोहित मिरजे, विश्वास गुरव, उदय जाधव, अरुण पाटील, पूनम जाधव, गजानन विभूते,विजय कुमार कांबळे, दिलीप टिपुगडे, पूजा आरडे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रगत यंत्रसामग्री आणि नाविन्यपूर्ण प्रयोग यांची माहिती देणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. या कृषी प्रदर्शनात 200 हून अधिक पशु-पक्षांचा सहभाग, विविध शेती अवजारे, बि-बियाणे, खतं, औषधे- 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग असणार आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती विषयक चर्चासत्र - प्रगत तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीची माहिती- आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे.