“पोलिसांच्या उलट्या बोंबा; निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना त्रास” — राजू शेट्टींचा आरोप

<p>“पोलिसांच्या उलट्या बोंबा; निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना त्रास” — राजू शेट्टींचा आरोप</p>

 

कोल्हापूर  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पोलिस यंत्रणेवर निशाणा साधत आरोप केले. गोध्रा हत्याकांडातील आरोपी पोलिस संरक्षणात फिरत असताना, निवडणूक जवळ आली की शेतकरी आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवर चोर- दरोडेखोरांसारखी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते, असा त्यांचा आरोप आहे.

राजू शेट्टींनी फेसबुकवर पोस्ट करून पोलिसांवर निशाणा साधलाय... ते म्हणतात की...
“पोलिसांच्या उलट्या बोंबा !...
गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत. 
मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शेतकरी आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवर जणू काही चोर, दरोडेखोर, खंडणीबहाद्दर यांच्याप्रमाणे पोलिसामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करून दिवस -दिवसभर चळवळीतील शेतक-यांना व कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. 
मटका , जुगार , दारू , अवैद्य धंदे यांच्याकडून हप्ते गोळा करणा-या पोलिस अधिका-यांनो तुम्ही काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा !”