कोल्हापूरच्या कासारवाडी गावच्या पश्चिम – उत्तर भागात गव्यांचा वावर...

 परिसरात भीतीचे वातावरण

<p>कोल्हापूरच्या कासारवाडी गावच्या पश्चिम – उत्तर भागात गव्यांचा वावर...</p>

कोल्हापूर – कोल्हापूर शहरालगतच्या कासारवाडी गावच्या पश्चिम – उत्तर भागात गव्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गिरोली- पोहाळे - भुये शिये उत्तर बाजुस जंगल परिसर आहे. तसेच अंबपवाडी - मनपाडळे - जाखले - पोखले दक्षिणेस तर सादळे - मादळे  गावच्या दक्षिण उत्तर बाजुस वनविभागाची जंगल हद्द आहे. तसेच कासारवाडी गावच्या पश्चिम व उत्तरेला घनदाट झाडी आहे. या झाडींना  लागुन शेती आहेत. त्यामुळे या परिसरात गव्यांचा वावर वाढला आहे.  गव्यांच्या कळपाचा शिरकाव नागरीवस्तीत होवू लागल्याने  स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.