फराळे येथील ओंकार शुगरने उसाला प्रतिटन ३ हजार ४६१ रुपये जाहीर केला दर

<p>फराळे येथील ओंकार शुगरने उसाला प्रतिटन ३ हजार ४६१ रुपये जाहीर केला दर</p>

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील फराळे येथील ओंकार शुगरच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ  रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी उत्कृष्ट काम करणारे तोडणी वाहतूकदार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी, ओंकार शुगर हा राधानगरी तालुक्यातील एकमेव औद्योगिक प्रकल्प असल्याचे सांगितले.

या औद्योगिक प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती बरोबर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी कारखान्याकडे येणाऱ्या उसाला प्रतिटन ३ हजार ४६१ रुपये देणारे असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शत्रुघ्न पाटील यांनी ओंकार ग्रुपकडून एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिल्याचे सांगितले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे, एस के पाटील, ज्ञानदेव पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमाला वैशाली डवर, सुवर्णा परीट, संदिप डवर, शशिकांत कांबळे, बाळकृष्ण चव्हाण, वसंत डवर, विश्वास आरडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.