कोल्हापुरात कृषी समृद्धी योजनेचा शुभारंभ; तेलबिया उत्पादन प्रशिक्षणाचे आयोजन

कोल्हापूर : नियोजनबद्ध शेती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढू शकते, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नरतवडे (ता. करवीर) येथे केले. कृषी समृद्धी योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमात तेलबिया उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. शेतकऱ्यांना सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल अशा पिकांचे उत्पादन वाढवण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. विविध तज्ज्ञांनी शेतीत संरक्षण, प्रक्रिया उद्योग, फळप्रक्रिया व आयुर्वेदिक वनस्पती या विषयांवर माहिती दिली.
मेळाव्यात प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शेतीतील यंत्रसामग्री, प्रक्रिया उद्योग, आधुनिक तंत्रज्ञानावरील स्टॉल्स उपस्थितांचे आकर्षण ठरले. पालकमंत्री आबिटकर यांनी शेतकऱ्यांना योग्य पीक निवड, संरक्षण व मार्केटिंगबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.