...आणि १२ दिवसांनंतर त्या अंड्यांमधून सरड्याच्या १३ पिल्लांनी घेतला जन्म
कोल्हापूरात कृत्रिम अधिवासात उबवली सरड्याची अंडी

कोल्हापूर - कोल्हापूरनजीकच्या बालिंगा रस्त्यावरील देवेंद्र पार्क येथे शुभम जाधव यांच्या नवीन घराचे काम सुरू आहे. याठिकाणी त्यांना अंडी निदर्शनास आली. ही अंडी उघड्यावर असल्याने ती खराब होऊ नयेत यासाठी शोयब टीम ऑफ स्नेक रेस्क्यूचे सदस्य गणेश कदम यांनी पट्टणकोडोलीचे वन्यजीव तज्ञ पप्पू खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम अधिवासात ती अंडी उबवण्याचा निर्णय घेतला. वाळू, कोको पावडर, लहान खडे वापरून त्यांच्यावर निरीक्षण ठेवण्यात आले आणि १२ दिवसांनंतर त्या अंड्यांमधून सरड्याच्या १३ पिल्लांनी जन्म घेतला. याला गार्डन लझर्ड असेही म्हंटले जाते. नवजात सरड्याच्या १३ पिल्लांना कदम यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.