शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्याच खिशावर डल्ला...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊसातून प्रतिटन पंधरा रूपये कपातीचा निर्णय

 

<p>शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्याच खिशावर डल्ला...</p>

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऊस गाळप मंत्री समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत महापुरामुळे नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊसातून प्रतिटन पंधरा रूपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील पाच रूपये बाधित शेतकऱ्यांना आणि दहा रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिले जाणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.

 सरकारला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशातून कपात करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. सरकारने अशा प्रकारच्या दलालीच्या भानगडीत पडू नये, असा इशारा त्यांनी दिलाय. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे नसून अजित पवार आणि विखे पाटलांसारख्या साखर सम्राटांच्या बाजूचे असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

अतिवृष्टीचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यांचे एकरी १० ते १२ टनांचं उत्पादन घटले आ.हे अशा परिस्थितीत त्यांच्यावर हा 'जिझिया कर' लादणे, अन्यायकारक असल्याचे माजी खासदार शेट्टींनी सांगितले आहे. ऊस उत्पादकांकडून पैसे घ्यायला साखर संघाने सुध्दा विरोध केला आहे.