ओम अॅग्रो सर्विसेसमध्ये शेतकऱ्यांना पॉवर टिलर, रिपरचं वितरण

कोल्हापूर - शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं २०२५ २६ अंतर्गत व्हीएसटीच्या १३, १३.५ आणि १६.५ एच पी कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कळंबा इथं प्रदीप पांडूरंग चौगले यांनी ओम अॅग्रो सर्व्हिसेस फर्मच्या माध्यमातून गेल्या २७ वर्षापासून शेतकर्यांना सेवा देण्याचं काम केलंय. गेल्या ७वर्षापासून व्हीएसटी पॉवर टिलर्स अँड ट्रॅक्टर्स लिमिटेड कंपनीच्या टिलर्स, रिपरची विक्री आणि विक्री पश्चात सेवा शेतकऱ्यांना दिलीय अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत पॉवर टिलर्स आणि रिपर खरेदीवर शेतकऱ्यांना ५० टक्के शासकीय अनुदान दिलं जातय. दसऱ्याचं औचित्य साधून आज या शोरूम मध्ये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगीरे, जिल्हा कृषी उपसंचालक नामदेव परीट, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, मंडल कृषी अधिकारी माने, उप कृषी अधिकारी संदीप कांबळे आणि गोसावी, व्हीएसटीचे विभागीय व्यवस्थापक विश्वजित सुतार, ओम ऍग्रोचे प्रदीप चौगले, राज चौगले, पि.डी. चौगले यांच्या हस्ते या योजनेअंतर्गत २१ शेतकऱ्यांना टीलर्स आणि रिपरचं वाटप करण्यात आलं. प्रदीप चौगले यांनी ओम अॅग्रो सर्व्हिसेसच्या विक्री आणि सेवेबद्दल माहिती दिली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगीरे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, व्हीएसटीचे विभागीय व्यवस्थापक विश्वजित सुतार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. शेतकर्यांनी शासनाच्या या योजनेचा अनुदान रुपी लाभ घेण्यासाठी ओम ऍग्रो सर्विसेस मध्ये एक वेळ अवश्य भेट देऊन, लाभ घेण्याचं आवाहन प्रदीप चौगले आणि राज चौगले यांनी केलंय