युध्दाची झळ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचली... 

आखाती देशातील निर्यात थांबल्याने लाखो टन कांदा बंदर परिसरात अडकला 

<p>युध्दाची झळ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचली... </p>

नवी दिल्ली – सध्या आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे आखाती देशातील निर्यात पूर्णपणे थांबली आहे. याचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. 
या युद्धामुळे लाखो टन कांदा बंदर परिसरात अडकला आहे. तो आता खराब होण्याची भीती शेतकरी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत. दुबई ही भारतीय कांद्याची प्रमुख निर्यात बाजारपेठ असून, महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणावर आखाती देशांकडे पाठविला जातो. मात्र, जहाज वाहतूक, विमा प्रक्रिया आणि आयात व्यवहारांवर परिणाम झाल्याने माल स्वीकारण्यात दुबईतील व्यापारी पुढे येत नाहीत. निर्यात प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण येथे निर्यातीसाठी सज्ज असलेले 150हून अधिक कंटेनर अडकले आहेत.
निर्यात थांबल्याने कांद्याचे भाव कमालीचे गडगडले आहेत. काल चाकणसारख्या कांद्याच्या मोठ्या मार्केटमध्ये तब्बल 13 हजार पिशव्या कांद्याची आवक होऊन किलोला सरासरी 10 रुपयांचा बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.