बिहार मुख्यमंत्र्यांची कृती लज्जास्पद : मुस्लिम युवा समाजाचा आरोप

समस्त मुस्लिम युवा समाजचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

<p>बिहार मुख्यमंत्र्यांची कृती लज्जास्पद : मुस्लिम युवा समाजाचा आरोप</p>

कोल्हापूर - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा आरोप असलेली घटना अत्यंत लज्जास्पद, स्त्रीविरोधी आणि संविधानविरोधी असल्याचे समस्त मुस्लिम युवा समाजाने म्हटले आहे. या घटनेमुळे महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचला असून धार्मिक स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकारांवर घाला घातला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले.

यावेळी फजल मुजावर, हसरत मुल्ला, नौशाद मणेर, युसुफ शेख, आरिफ मुल्लानी, इरफान पठाण, शरीफ सुतार, जुबेर शेख, जहीर जमादार, सोहेल बागवान, शहीद मोमिन आणि तौफिक शेख उपस्थित होते.