अत्याचार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेसाठी कायदा करा... 

हिंदू महासभेची मागणी

<p>अत्याचार करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेसाठी कायदा करा... </p>

कोल्हापूर - राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला आणि मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरण, मालेगाव मधील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची करण्यात आलेली हत्या, अशा घटना राज्यात घडत आहेत. सर्वसामान्य लोकांच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी कायदा संमत करावा, अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे.

या मागणीसाठी महासभेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी "फाशी द्या फाशी द्या महिला आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या" अशी घोषणाबाजी केली.

या आंदोलनात हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर, शिवानंद स्वामी, सुनील सामंत, प्रशांत पाटील, नंदकुमार घोरपडे, विकास जाधव, सुरेश जाधव, शीलाताई माने, रेश्मा साळोखे आदींनी सहभाग घेतला होता.