ऊस दरावरून आमदार शिवाजी पाटील यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना.. २३ नोव्हेंबरला राजगोळी येथे आंदोलन

<p>ऊस दरावरून आमदार शिवाजी पाटील यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना.. २३ नोव्हेंबरला राजगोळी येथे आंदोलन</p>

चंदगड – शुक्रवारी रात्री आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या निवासस्थानी कारखाना चालक–मालक, शेतकरी प्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेवून ३४०० रुपयांवर सहमती दर्शवली. हा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नसलेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना राजगोळी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शुक्रवारी रात्री आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या निवासस्थानी कारखाना चालक–मालक, शेतकरी प्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेवून ३४०० रुपयांवर सहमती दर्शवली.यावर तीनही तालुक्यातील साखर कारखानदारांनी एकजूट करून शेतकऱ्यांच्या आर्थिक हक्कांचे नुकसान केले, असा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. दरम्यान, “चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनो आपल्या घामाच्या लढाईसाठी यायला लागतय. तीनही तालुक्यातील कारखानदार एकजूट करून ऊस उत्पादक शेतक-यांचे नुकसान करत आहेत. आपणही संघटित होवूया. मागील थकीत एफ. आर. पी. व चालू हंगामातील 3600 रुपये पहिली उचल मिळवूया..मी येतोय...तुम्हीही या,” असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

राजू शेट्टी यांच्या या आंदोलनामुळे भविष्यात आमदार शिवाजी पाटील यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाला “शक्तीपीठ” महामार्गाची किनार असल्याचे बोलले जाते.