रंकाळा तलाव परिसरात विनापरवाना वृक्षतोड; कारवाईची मागणी

<p>रंकाळा तलाव परिसरात विनापरवाना वृक्षतोड; कारवाईची मागणी</p>

कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर महापालिका हद्दीतील शेकडो झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात येतीय. असं असताना देखील महापालिकेचा उद्यान विभाग मात्र डोळेझाक करत असल्याचं दिसून येतंय. हरी ओम नगरमधील पोल्ट्री फार्मजवळ खैर, धावडा, बांबू, निलगिरी, चिंच यांसह अनेक वृक्षांची तोड करण्यात आल्या बद्दल याबाबत मानवाधिकार सहायता संघानं महापालिका प्रशासनाकडं तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनंतर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून पंचनामा करण्यात आलाय. बेकायदेशीर वृक्षतोडी बद्दल संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मानवाधिकार सहायता संघाचे जिल्हाध्यक्ष बंडा लोंढे यांच्यासह दीपक सामानगडकर यांनी केलीय.

यावेळी विक्रम पाटील, सुहास पाटील, महमदशरीफ काझी, राजेंद्र माळली, योगेश कांबळे,, अनंत पाटील, ओंकार लोंढे, विनायक पाटील यांच्यासह मानवाधिकार सहायता संघाचे सदस्य उपस्थित होते.

या अगोदर राजाराम तलाव परिसरातील कन्वेन्शन सेंटरसाठीची वृक्षतोड चर्चेत असताना आता हा दुसरा प्रकार समोर आल्यामुळं महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षा बद्दल वृक्षप्रेमीं मधून नाराजी व्यक्त होतीय.