स्वत:च्या मासिक पेन्शन सन्मानधनासाठी ज्येष्ठ नागरिक उतरणार रस्त्यावर... 

<p>स्वत:च्या मासिक पेन्शन सन्मानधनासाठी ज्येष्ठ नागरिक उतरणार रस्त्यावर... </p>

कोल्हापूर - शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये सन्मानधन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. परंतु त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळं ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले आहेत. स्व:ताच्या मासिक पेन्शन सन्मानधनासाठी हे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत.


ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पेन्शन सन्मानधनासाठी अर्थक्रांती जीवन गौरव अभियान आणि महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक जागृती मंचच्यावतीने ‘महालक्ष्मीच्या दारी सन्मान वारी’ काढण्यात येणार आहे. 
मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता सन्मान वारीला सुरवात होणार आहे. यावेळी पन्नास हजारांच्या सह्यांचं पत्र अंबाबाई चरणी अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार बैठकीत मंचाचे मुख्य समन्वयक जगन्नाथ मोरे – पाटील यांनी दिली आहे.
यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक पारंपारिक वेशभूषा परिधान करून हातात फलक, टाळ, मृदुंगाच्या गजरात सन्मान वारीत सहभागी होणार आहेत. ही वारी गांधी मैदान ते खरी कॉर्नर, बिन खांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड ते श्री महालक्ष्मी मंदिर पश्चिम द्वार या मार्गे निघणार आहे.