दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनाची कोल्हापूरात निदर्शने

<p> दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनाची कोल्हापूरात निदर्शने</p>

कोल्हापूर - काही दिवसांपूर्वी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात बॉम्बस्फोट झाला. या घटनेत अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आज कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. मुस्लिम समाजात सुधारकांची संख्या कमी असल्यामुळे  या समाजाच्या विचार परिवर्तनासाठी राष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजसुधारणा कार्यक्रम राबवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागण्यांचे देण्यात आले. यावेळी चंद्रकांत बराले, दीपक देसाई, विलास मोहिते, गजानन तोडकर, शीला माने, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.