अन्न सुरक्षेसाठी दाखल अर्ज नामंजूर केल्याने इचलकरंजीत पुरवठा निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या

<p>अन्न सुरक्षेसाठी दाखल अर्ज नामंजूर केल्याने इचलकरंजीत पुरवठा निरीक्षकांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या</p>

इचलकरंजी - शहरातील १७२ नागरिकांनी अन्न सुरक्षा योजनेतून धान्य मिळावे, यासाठी पुरवठा कार्यालयाकडे अर्ज केले होते. मात्र पुरवठा कार्यालयाकडून हे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्जदारांसह माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी आज पुरवठा कार्यालयाला धडक दिली.

यावेळी त्यांनी पुरवठा निरीक्षक एस. के आडे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आडे यांनी आंदोलकांशी चर्चा करत १७२ अर्जापैकी ५६ अर्ज मंजूर केल्याची माहिती दिली. त्यांनी उर्वरित अर्जाची पडताळणी करून येत्या सोमवारी सर्वांची अंतिम यादी जाहीर केली जाईल, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.