शिरोळमध्ये ऊस दरावरुन वादावादी...पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात
कोल्हापूर – शिरोळमध्ये दत्त कारखान्याची ऊस वाहूतक आंदोलन अंकुश संघटनेने रोखली. त्यामुळे कारखाना समर्थक आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात तीव्र झटापट झाल्याने धनाजी चुडमुंगे बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आंदोलनातील काही युवकांना ताब्यात घेतले आहे. सध्या ऊस दरावरुन छत्रपती शिवाजी महाराज चौकात वादावादी झाल्याने तणावाचे वातावरण पसरले आहे.