कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकल्या...
जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन चिघळलं...
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उजळाईवाडी विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांनी उसाच्या कांड्या टाकून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. त्यावेळी ऊस दरावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.
तसेच एक कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने ऊस दराचा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
ऐनवेळी कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने सुरक्षा रक्षकांसह सर्वांची पळापळ झाली. यावेळी त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.