आज सरकारी डॉक्टरांकडून राज्यभर आंदोलनाची हाक...आरोग्य यंत्रणा कोलमडली 

<p>आज सरकारी डॉक्टरांकडून राज्यभर आंदोलनाची हाक...आरोग्य यंत्रणा कोलमडली </p>

कोल्हापूर  – फलटणमधील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरने केल्या आत्महत्येमुळे राज्यामधून संतापाची लाट उसळली. या महिला डॉक्टरवर झालेल्या अन्यायाचा निषेध करत महाराष्ट्र रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने आंदोलनाची हाक दिली आहे त्यानुसार आज राज्यभरातील सरकारी रूग्णालयामधील सेवाधीन डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.
त्या अनुषंगाने कोल्हापुरातील सीपीआर रूग्णालया समोर डॉक्टरांनी संप सुरु केला आहे. यावेळी डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी लावून धरत जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.