शासकीय भरती प्रक्रिया त्वरित राबवा : हिंदू जन संघर्ष समितीची मागणी
									
																		
																											 
																	कोल्हापूर - राज्यातील अनेक शासकीय विभागांमध्ये मागील काही वर्षांपासून विविध अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची पदे दीर्घकाळ रिक्त आहेत. शासकीय आस्थापनेतील रिक्त पदांची भरती झाली नसल्याने सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर चार-चार, पाच-पाच विभागांचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलाय. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागात अनेक अधिकाऱ्यांकडे तीन ते चार विभागांचा एकत्रित कार्यभार देण्यात आलाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे वेळेत होत नाहीत. परिणामी सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयात कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येतीय. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून शासकीय आस्थापनेतील रिक्त पदांची तात्काळ भरती करावी, यासाठी आज हिंदू जनजागृती संघर्ष समितीच्या शिष्टमंडळांने उपजिल्हाधिकारी महसूल विभाग संपत खिलारे यांची भेट घेत त्यांना मागण्याचे निवेदन दिले आहे.
यावेळी हिंदू जन संघर्ष समितीचे अभिजीत पाटील, आनंदराव पवळ, कविराज कबुरे, राजेंद्र तोरस्कर, संभाजी थोरवत, विजय पवार, अजय सोनवणे, सुरेश जाधव, स्वप्निल पोवार उपस्थित होते.
