कसबा बावडा रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरवर थर्मो-प्लास्टिक मार्किंग आणि थर्मो-प्लास्टिक रॅम्बलर लावण्याची मागणी

<p>कसबा बावडा रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरवर थर्मो-प्लास्टिक मार्किंग आणि थर्मो-प्लास्टिक रॅम्बलर लावण्याची मागणी</p>

कोल्हापूर :  कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील कसबा बावडा परिसर हा उत्तर दिशेहून शहरात येणाऱ्या वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग आहे. या भागात लोकवस्ती, महाविद्यालये तसेच शिरोली एमआयडीसी आणि शहराच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या परिसरातील वाहनांची गती तुलनेने जास्त असते. सध्या रस्त्यांवर असलेले अनेक स्पीड ब्रेकर स्पष्टपणे दिसत नाहीत, त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी, वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज भगवा चौक, कसबा बावडा–शिये रोडवरील अष्टविनायक कॉलनी परिसर, बावडा भाजी मंडईच्या पूर्व-पश्चिम बाजूस तसेच रस्त्यांवरील सर्व स्पीड ब्रेकरवर थर्मो-प्लास्टिक मार्किंग आणि थर्मो-प्लास्टिक रॅम्बलर लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलीय. मागणीचे निवेदन नागरिक प्रतिनिधींनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलं.

यावेळी प्रदीप उलपे,  रोहित पंदारे, स्वप्नील चौगुले, अभिजीत परीट,  निखिल पवार, विजय जाधव, समीर शेख, सुमित सनगर आदी उपस्थित होते.